नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने केला तरुणावरच अनैसर्गिक अत्याचार


ग्वाल्हेर : नोकरीच्या बहाण्याने तरुणावर शारीरीक अत्याचार करण्यात आल्याची घटना ग्वाल्हेरमध्ये घडली. लोकायुक्त इन्स्पेक्टरचे लज्जास्पद कृत्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे शिवाय सात महिने अनैसर्गिक सेक्स करण्यात आल्याची बाब समोर आली असून पीडित तरुणाने वैतागून व्हिडिओ बनवला आणि पोलिसांत तक्रार केली.

हॉटेलमध्ये नेत केले अत्याचार
लोकायुक्त निरीक्षकाने एका तरुणाला नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन त्याच्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. लैंगिक छळ केलेल्या तरुणाला नोकरी तर दिली नाहीच, उलट धमकावून 7 महिने त्याचे शोषण केले. या अत्याचारातून सुटका करून घेण्यासाठी तरुणाने त्याच्या मित्रासोबत इन्स्पेक्टरचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या मदतीने तरुणाने इन्स्पेक्टरविरोधात तक्रार केली. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी इन्स्पेक्टरविरुद्ध गैरवर्तन आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.



नोकरीच्या नावाखाली फसवणूक
युनिव्हर्सिटी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ग्वाल्हेरच्या नाका चंद्रवदनी भागात राहणारा 32 वर्षीय तरुण बेरोजगार आहे. पदवीनंतर हा तरुण नोकरीच्या शोधात होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये एका मित्राने त्याची ग्वाल्हेर लोकायुक्तमध्ये तैनात इन्स्पेक्टर सुरेंद्र यादव यांच्याशी ओळख करून दिली. गेल्या वर्षी 5 जुलै रोजी इन्स्पेक्टर सुरेंद्र यांनी तरुणाला फोन करून रेल्वे स्टेशनजवळ बोलावले. येथून इन्स्पेक्टरने तरुणाला आपल्या कारमध्ये बसवले आणि सिटी सेंटर परिसरात असलेल्या हॉटेल लँडमार्कमध्ये नेले. हॉटेलच्या खोलीत नेऊन इन्स्पेक्टरने नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. यानंतर इन्स्पेक्टर तरुणाला कधी हॉटेलमध्ये तर कधी त्याच्या खोलीत बोलावून त्याच्यावर अत्याचार करत होता. नोकरी न मिळाल्याने तरुणाने इन्स्पेक्टरपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, मात्र इन्स्पेक्टरने त्याच्या गणवेशाचा धाक दाखवून त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. शेवटी पीडितेने हा संपूर्ण प्रकार त्याच्या मित्राला सांगितला.

मित्राने बनवलेला व्हिडिओ
इन्स्पेक्टर सुरेंद्र यादवने तरुणासोबत अनैसर्गिक सेक्स केल्यानंतर धमक्या देण्यास सुरुवात केली, तेव्हा पीडितानेआपल्या मित्राच्या मदतीने इन्स्पेक्टरच्या दुष्कृत्याचा व्हिडिओ बनवला. प्रथम व्हिडीओ इन्स्पेक्टरला दाखवून तक्रारीबाबत बोलले. सुरेंद्र यादवने पोलिसांच्या वर्दीत त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. शेवटी तरुणाने व्हिडिओ पाठवून पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रार केली.

आरोपीविरोधात गुन्हा मात्र संशयीत पसार
वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्हिडिओच्या आधारे लोकायुक्त निरीक्षक सुरेंद्र यादव यांच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गुन्हा नोंदवला. एएसपी राजेश दंडौतिया यांनी सांगितले की, आरोपी लोकायुक्त निरीक्षकाविरुद्ध भादंवि कलम 377 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध घेत लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !