चाळीसगावात गुढीपाडव्याला रंगणार कुस्त्यांची दंगल
चाळीसगाव : शहरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ा परंपरेनुसार रघुवीर व्यायाम शाळेच्या वतीने भव्य कुस्तीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री रघुवीर व्यायाम शाळा व कै. कोंडाजी वस्ताद व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे यंदाही शनिवार, 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य कुस्तीचा सामना घाट रोड वरील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या भव्य प्रांगणात होईल.
माजी मंत्री महाजनांच्या हस्ते आखाडा पूजन
कुस्तीचा आखाडा पूजन माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. कुस्ती उद्घाटन जळगाव लोकसभा खासदार उमेश पाटील, चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी आमदार राजीव देशमुख असतील.





नामवंत मल्लांची आखाड्यात उपस्थिती
कुस्ती सामने दुपारी 3 ते 7 या वेळेत घेण्यात येणार आहे. कुस्तीसाठी आमंत्रीत मल्लासह विविध जिल्ह्यातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत तरी कुस्तीप्रेमींनी व नागरिकांनी सामन्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यायामशाळेचे अध्यक्ष अक्षय अग्रवाल, उपाध्यक्ष शेख गफुर शेख हजरतनूर, सचिव रमेश जानराव यांच्यासह योगेश अग्रवाल व अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.
