‘आमच्याकडे काय बघतो’ असे म्हणत तरुणाच्या दगड डोक्यात टाकून तरुणाला केले गंभीर जखमी


जळगाव : दारुच्या नशेत असलेल्या तरुणांनी ‘आमच्याकडे काय बघतो’ असे म्हणत तरुणाच्या दगड डोक्यात टाकून तरुणाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरातील शारदा माध्यमिक विद्यालयाजवळ विरु प्रेमसिंग राठोड हा तरुण मजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंगजवळ काही तरुण उभे होते. यातील सागर नावाच्या तरुणाने दारुच्या नशेत विरुला आमच्याकडे काय बघतो, असे म्हणत त्याच्या हातातील दगड विरुच्या डोक्यात मारीत त्याला दुखापत केली तसेच सागर सोबत असलेले शेख व इतर दोघांनी विरुला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात विरु राठोडच्या तक्रारीवरुन सागर, शेखर (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) रा. कुसुबा ता. जळगाव व त्यांचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विजय पाटील हे करीत आहे.




आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून : पाचोरा शहरातील घटना


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !