जळगाव कामगार आयुक्त कार्यालयातील लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात
30 हजारांची लाच भोवली : लाच प्रकरणाने अधिकार्यांच्या वाढल्या अडचणी
भुसावळ : कंत्राटी पदावर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवून देण्यासाठी दोन लाख 10 हजारांची मागणी करून त्यातील पहिला 30 हजारांचा हप्ता स्वीकारताना जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई गोपाळ कडू चौधरी (55,
रा.जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ कार्यालयातच अटक केली. सोमवार, 11 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी झाल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
लाचेचा मोह भोवला
जळगाव तालुक्यातील 35 वर्षीय तक्रारदार सुशिक्षीत बेरोजगार आहेत. त्यांनी जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सुरक्षा रक्षक पदावर नोकरी लावून ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपी शिपाई गोपाळ कडू चौधरी याने सोमवारी दोन लाख 10 हजारांची मागणी केली व त्यातील 30 हजारांची रक्कम सोमवारीच पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडे मागितला. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी होवून सापळा रचण्यात आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या परीसरात लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.



यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.