तळवेल फाट्याजवळ कार बैलगाडीवर धडकली : पती-पत्नीवर जखमी


वरणगाव : तळवेल फाट्याजवळ कारने बैलगाडीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन बैलांचा मृत्यू झाला तर शेतकरी पती-पत्नी जखमी झाले. हा अपघात शनिवार, 7 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. जखमी पती-पत्नीवर जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

अकरा हजारांची लाच भोवली : वर्डीतील लाचखोर ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

शेतकरी दाम्पत्य जखमी
सतीश पद्माकर पाटील (53) व सुरेखा पाटील (45, दोघे रा.दर्यापूर ता.भुसावळ) अशी जखमी दाम्पत्याची नावे असून पाटील यांची शेती तळवेल शिवारातील महामार्गाला लागून असून ते महामार्गावरून बैलगाडी घेवून जात असताना पाठीमागून आलेली भरधाव कार बैलगाडीवर धडकली.

डॉक्टरांना भामट्यांनी घातला 49 हजारांचा गंडा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !