Eknathrav Khadseमाजी मंत्री एकनाथराव खडसेंनी चालवले आमदार चंद्रकांत पाटलांवर टिकेचे बाण : म्हणाले की ….!
Eknathrav Khadse रावेर : शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होऊन राज्यात सरकार येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते त्यामुळे देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन असे वारंवार सांगत होते पणत्यांना थांबवण्याचे काम शरद पवार यांनी केले. शरद पवार यांच्या विचारांना मानून सर्व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना निवडून दिले. यानंतर ते आपल्यासोबत राहतील. असे पवार साहेबांना वाटत होते मात्र निवडणूक जिंकताच ते राष्ट्रवादीसोबत न राहता वेगळ्याच पक्षाकडे वळाले. शरद पवार यांच्यासोबत आमदार पाटील यांनी गद्दारी केली, परखड टिका माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.कोचूर (ता.रावेर) येथे रविवारी सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी कै.ब्रिजलाल पुना पाटील व के. पांडुरंग पुना पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्ग रथाचे लोकार्पण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
चोरट्यांना भावली बुलेट : न्हावीतील दुचाकीधारकाला लाखाचा फटका
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा बँक संचालिका अॅड.रोहिणी खडसे, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, रवींद्र पाटील, सोपान पाटील, नीलकंठ चौधरी , हारून शेख, राहुल पंडित, पीतांबर पाटील, जगदीश बढे, योगिता वानखेडे, दीपक पाटील, कोचूरचे सरपंच भगवान आढाळे, संजय पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
एरंडोल शहरातील विवाहितेची आत्महत्या : एकाविरोधात गुन्हा
राणा यांनी स्वतःच्या बळावर निवडून यावे
खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याअगोदर आधी स्वतःच्या स्वतःच्या बळावर निवडून यावे. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या टेकूमुळे त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांनी उगाचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देवू नये, असेही खडसे म्हणाले. सदावर्ते, राणा दाम्पत्य यांच्यासह सारे काही अशांतता पसरली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. मशिदींसमोर भोंगा लावणे हा त्याचाच प्रकार आहे. यामागील राजकारण समजल्याने सलोखा आहे म्हणूनच राज ठाकरेंचा भोंगा फूस झाल्याचे खडसे यावेळी म्हणाले.
दिड लाखांच्या गांजासह तस्कर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात



