भुसावळात महिलेचे अंघोळ करताना फोटो काढून विनयभंग
भुसावळ : शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचे अंघोळ करताना व कपडे घालतांनाचे व्हिडीओ व फोटो काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
शहर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, १६ मे रोजी सकाळी ८ वाजता महिला अंघोळ करून कपडे घालत असतांना शेजारी राहणारा संशयीत आरोपी प्रतीक जीवन शिंगारे (३४) याने व्हिडीओ आणि फोटो काढले. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रतिक शिंगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी करीत आहे.







