कोळन्हावी शेतशिवारात भिंत कोसळून यावलचा तरुण ठार


यावल : तालुक्यातील कोळन्हावी शेत शिवारात तापी नदीच्या काठी शेतात बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळल्याने दुर्घटनेत यावल शहरातील १९ वर्षीय तरूण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. शेख दानिश शेख रफिक (१९, यावल) असे मयताचे नाव आहे.

अचानक भिंत कोसळली
कोळन्हावी, ता.यावल येथील योगेश विठ्ठल सोळुंके यांचे पुनगाव रस्त्यावर तापी नदीच्या काठी शेत आहे. या शेतात बुधवारी यावल येथील गवंडी कामगारांच्या वतीने बांधकाम सुरू होते. बांधकाम करण्यासाठी या ठिकाणी मिक्सर ग्राइंडर आणले होते. या मिक्सर ग्राइंडरवर यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील डांगपूरा भागातील रहिवासी शेख दानिश शेख रफिक (१९) हा तरूण बसला होता. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक भिंत मिक्सर ग्राइंडरवर कोसळली व मिक्सर ग्राइंडरखाली दाबला जाऊन शेख दानिश हा जागीच ठार झाला. या घटनेमुळे यावल शहर व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख दानिश शेख रफिक हा प्रथमच गवंडी कामासाठी आला होता व अशा दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने यावल शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !