सात महिन्यांपासून पसार महिला आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : पोस्कोच्या गुन्ह्यात तब्बल सात महिन्यांपासून पसार असलेल्या महिला आरोपी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सपना सागर पाटील (23, कांचन नगर, असोदा रोड, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली अटक
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक जगदाळे, एएसआय आनंदसिंग पाटील, दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, छगन तायडे, सपना येरंगुठला आदींच्या पथकाने सपना पाटील हिला जळगावातील जैनाबाद भागातून बुधवारी सकाळी सात वाजता अटक केली.







