डोणगावात पाणी भरण्यावरून वाद, एकावर विळ्याने हल्ला : दोघांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील डोणगाव येथील सार्वजनिक नळाला आलेले पाणी इलेक्ट्रिकल मोटारीने शेजारी व्यक्ती भरत असताना दीड तासापासून तुम्ही पाणी भरले, आता मला पाणी भरू द्या असे सांगण्याचा राग येऊन एकाला दोघांनी मारहाण केली व विळ्याने त्याच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत केली म्हणून दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
डोणगाव, ता.यावल येथील अनिल चुडामण पाटील यांनी यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळ सार्वजनिक पाणीपुरवठा करणारा नळ आहे. या नळाला सायंकाळी पाणी आले असता या सार्वजनिक नळाला इलेक्ट्रिकल मोटर लावून घराशेजारील रहिवासी धनराज पाटील हे त्यांच्याकडे पाणी भरत होते. सुमारे दीड तासापासून त्यांचे पाणी भरले जात होते. नळावर जाऊन फिर्यादीने त्यांना सांगितले की, आम्हाला पण पाणी भरू दे., तेव्हा याचा राग येऊन धनराज पाटील यांनी फिर्यादी अनिल पाटील यास शिवीगाळ केली व या भांडणात त्याचा मुलगा विशाल धनराज पाटील हा आला व त्याने घरातुन विळा आणत फिर्यादी अनिल पाटील यांच्यावर विळ्याने हल्ला केला व बचावासाठी पाटील यांनी हात पुढे केल्याने त्यांच्या डाव्या हातावर दुखापत झाली तसेच त्यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली विळा लागत ते जखमी झाले. ईश्वर पाटील, रोहित पाटील, विनोद पाटील, चंद्रभागा पाटील हे धावुन आले व त्यांनी भांडण सोडवले. अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात धनराज शेनपडु पाटील व विशाल धनराज पाटील (दोघे रा.डोणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार अजीत शेख, हवालदार नरेंद्र बागुल करीत आहेत.
आंतरजातीय विवाहानंतर वरासह पोलिसांवर हल्ला : चौघा आरोपींना अटक







