50 हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या चोरीला


जळगाव : जळगाव तालुक्यातील पडसोद शिवारातील शेतातून 50 हजार रुपये किंमतीच्या ठिबक सिंचनच्या नळ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब गुरुवारी उघडकीस आली. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेती साहित्याच्या चोर्‍या वाढल्या
प्रमोद तुकाराम पाटील (42, पडसोद, जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पडसोद शिवारातील शेत गट क्रमांक 119 मध्ये शेत आहे. बुधवार, 8 जून रोजी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी सहा वाजता घरी पोहोचले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतातील बांधावरील 50 हजार रुपये किंमतीच्या ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरून नेल्या. दुसर्‍या दिवशी गुरुवार, 9 जून रोजी सकाळी आठ वाजता प्रमोद पाटील हे शेतात गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संदीप पाटील करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !