वरखेडच्या विष प्राशन केलेल्या शेतकर्‍याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून बोदवड तालुक्यातील शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन केले होते मात्र या शेतकर्‍यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते व उपचारादरम्यान शेतकर्‍याची प्राणज्योत मालवली. नितीन गणेश राणे (36, रा.वरखेड, ता. बोदवड) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पांढर्‍या सोन्याने दिला दगा
बोदवड तालुक्यातील वरखेड येथे नितीन गणेश राणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गावातच त्यांची शेती असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. गेल्यावेळेस त्यांनी शेतात कपाशीची लागवड केली मात्र निम्मे उत्पन्नदेखील मिळाले नाही व त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यातूनच नितीन राणे यांनी शेतात फवारणीचे औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना शुक्रवार, 10 रोजी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परीवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !