बस स्थानकाच्या पाठीमागे बेवारस वयोवृद्धेचा मृतदेह आढळला
चाळीसगाव : शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे एका 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी आढळला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
चाळीसगाव शहर पोलिसात नोंद
शुक्रवार, 10 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ सुरक्षा रक्षक राजेंद्र कृष्णा पाटील हे त्या ठिकाणाहून जात असतांना त्यांना एका 70 वर्षीय अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सुमारास आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वयोवृद्धाची ओळख अद्याप पटलेली नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास नाईक अमित बाविस्कर हे करीत आहे.







