चोरटे मुक्कामी : जळगावातून शिक्षकाची दुचाकी चोरीला
जळगाव : शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पार्किंग झोनमधून शिक्षकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांचा उच्छाद कायम
अनिल पांडूरंग दांडगे (41, फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) हे शिक्षक असून गुरूवार, 9 जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते दुचाकी (क्रमांक एम.एच.19 के.8999) ने जिल्हा शासकीय रुग्णालयात कामानिमित्त आले असता 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी जिल्हा रुग्णालयातील गेट नंबर दोनमध्ये पार्किंग झोनमध्ये लावली मात्र दुपारी दोन वाजता काम आटोपून अनिल दांडगे हे दुचाकीजवळ आले असता दुचाकी चोरीला गेल्याचे उघड झाले. शनिवार, 11 जून रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करीत आहे.







