अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त : दोघांविरोधात गुन्हा


जळगाव : तालुक्यातील डोमगाव फाट्याजवळून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करीत ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
जळगाव तालुक्यातील वावडदा ते पाथरी गावादरम्यान असलेल्या डोमगाव फाट्याजवळून वाळूची चोरी वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 सी.झेड.817) महसूल पथकाने शनिवार, 11 जून रोजी सकाळी 9 वाजता पकडले. वाळू वाहतूकीचा परवानाबाबत विचारले असता ट्रॅक्टर चालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पथकाने ट्रॅक्टर जप्त केले असून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. प्रदीपसिंग पुष्पसिंग राजपूत (निमखेडी शिवार, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टर मालक प्रवीण पाटील (बिलवाडी) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !