जळगावनजीक भरधाव रीक्षाला नीलगाय धडकली : भुसावळातील केळी विक्रेत्याचा जागीच मृत्यू
जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या रिक्षाला दुरदर्शन टॉवरजवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या निलगायीने जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी होवून त्यात भुसावळातील केळी व्यावसायिक विक्रेता जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री च्या सुमारास घडला. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. साबीर सत्तार बागवान (40, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अपघाताने भुसावळ हळहळ
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, “भुसावळकडून जळगावकडे येणारी रीक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही.९५२१) येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून निलगायीने रस्ता क्रॉस करत असतांना रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी झाली यात रिक्षात बसलेले शाबीर सत्तार बागवान याला डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रीक्षा चालक मोहम्मद आलम मोहम्मद जान (48, रा. भुसावळ), बबता कन्हैय्याल बडगुजर (45, रा. पिंपळगाव, ता.एरंडोल), नसरीनबी चांद बागवान (55, रा. धुळे) आणि साहिल मकबल बागवान (13, रा. तांबापूरा) हे चौघं गंभीर जखमी झाले.
एमआयडीसी पोलिसांची धाक
अपघात झाल्यानंतर चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.” अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.