वरणगावात माजी नगराध्यक्षांनाच मोठा धक्का : अन्य प्रभागातून लढवावी लागणार निवडणूक
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुरळकर, मुख्याधिकारी शेख समीर, प्रशासकीय अधिकारी पंकज सुर्यवंशी उपस्थित होते. आरक्षण सोडत निधी निलेश झांबरे या बालकाच्या हस्ते काढण्यात आली. विशेष म्हणजे आरक्षण सोडतीत सर्वात मोठा धक्का वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनाच बसला असून त्यांना आता हक्काच्या प्रभागाऐवजी अन्य प्रभागातून निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. काळे यांच्या प्रभाग दहा मध्ये एका एस.सी. साठी तर दोन जागा महिला राखीव निघाल्याने काळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत तर पक्ष सांगेल त्या प्रभागातून आपण निवडणूक लढवू, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
असे आहेत वरणगावातील आरक्षण
प्रभाग एक अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दोन अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग तीन अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग चार अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पाच अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सहा- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सात अ- अनु.जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग आठ अ- अनु.जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग नऊ अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दहा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण महिला, क- अनु.जाती सर्वसाधारण
भुसावळ पालिकेत आरक्षणानंतरही विद्यमान नगरसेवक ‘सेफ’
रावेरात आरक्षणानंतरही विद्यमान नगरसेवकांना दिलासा
फैजपूर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर
सावदा पालिकेत दहा जागांवर महिलांना संधी