Yawal Tahasil ACB TRAP यावल तहसीलचा लाचखोर अव्वल कारकून जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Yawal Tahasil ACB TRAP यावल : अवघ्या पाचशे रुपयांच्या लाचेचा मोह यावल तहसील कार्यालयाच्या कोषागार विभागातील अव्वल कारकूनाला भोवला आहे. जळगाव एसीबीच्या पथकाने संशयीताला लाच स्वीकारताच यावल तहसील कार्यालयातून अटक केली. मुक्तार तडवी (यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दस्तावेज देण्यासाठी मागितली लाच
तक्रारदार यांच्याबाबत शेतजमीन वादाचा निकाल लागला असून त्याबाबतचे दस्तावेज देण्यासाठी आरोपी मुक्तार तडवी यांनी शासकीय फीचे 990 रुपये तसेच पाचशे रुपये लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. कोषागार कार्यालयात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपीला पथकाने अटक केली. विशेष म्हणजे लाचखोर तडवी यापूर्वी देखील एसीबीच्या सापळ्यात अडकले असल्याची माहिती मिळाली.
यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.