सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूरानंतर यावलमध्ये वातावरण संतप्त

पोलिसांचा शहरात काटेकोर बंदोबस्त : सौम्य लाठीमारानंतर जमाव पांगला


यावल : एका समाजाच्या भावना दुखावतील असा आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडीयावर टाकल्यानंतर मंगळवारी शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. बुरूज चौकात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरील जमावाला परतावून लावले मात्र जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगवला.

अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
यावल शहरातील एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट एकाने सोशल मीडियावर टाकल्यानंतर ती व्हायरल झाल्याने मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर पोलिस ठाण्याजवळ जमला तर शहरातील बुरूज चौकात मोठ्या जमाव येत असताना पोलिसांनी जमावाला परतवण्याच्या सूचना करूनही जमाव ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांनी धाव घेतली तर विविध भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरीकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे व येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांनी केले आहे.

रावेर तालुक्यातील तरुणीवर गुंगीचे औषध देत अत्याचार : आठ जणांविरोधात गुन्हा

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !