पाचोरा रेल्वे स्थानकावर सहा लाखांचे दागिने असलेली बेवारस बॅग आढळली


पाचोरा : पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील पी.जे. रेल्वे स्थानकानजीक महिला सफाई कामगाराला सहा लाख सहा हजार 809 रुपये किंमतीचे बेवारस सोन्याचे दागिने असलेली पिशवी सापडली असून महिलेने प्रामाणिकता दाखवत ही पिशवी पाचोरा जीआरपीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

शिरपूर तालुका हादरला : वादात मध्यस्थी करणार्‍या पित्याचा मुलाने केला खून

बेवारस दागिण्यांच्या मालकाचा शोध
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवार 16 जुन रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास रेल्वे महिला सफाई कामगार उषाबाई गायकवाड या ड्युटीवर असतांना रेल्वे स्टेशन परीसरात स्वच्छता करता पीजे रेल्वे स्थानकानजीक एक निळ्या रंगाची कॅरी बॅग आढळली.

दागिण्यांच्या मालकांचा पोलिसांकडून शोध
ही कॅरी बॅग उषाबाई गायकवाड यांनी रेल्वे सफाई विभागाचे सुपरवायझर शरद पाटील यांच्याकडे दिल्यानंतर शरद पाटील व त्यांचे सहकारी कॅरी बॅग घेऊन जीआरपी कार्यालयातील एएसआय ईश्वर बोरुडे यांनी दाखवली असता ईश्वर बोरुडे यांनी सर्वांसमोर कॅरी बॅग उघडल्यानंतर त्यात सोन्याचा हार, 4 बांगड्या, पेंडल, एक जोड कानातील रिंग, एक जोड साखळी टॉप्स व एक गळ्यातील चैन आढळली. ईश्वर बोरुडे यांनी दोन सरकारी पंचासह पंचनामा करुन मुद्देमाल पाचोरा येथील सराफ असोसिएशनकडे नेवून ऐवजाची तपासणी केली असता आढळून आलेला ऐवज हा सोन्याचा असल्याचे निष्पन्न झाले. ऐवजाचे वजन केले असता 129. 660 ग्रॅम अर्थात बाजारमूल्य सहा लाख सहा हजार 809 रुपये भरले. सहाय्यक निरीक्षक किसन राख यांना ही बाब कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान, बेवारस असलेल्या पिशवीतील दागिण्यांच्या मूळ मालकाचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

शहादा तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करीत अत्याचार : आरोपीला अटक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !