मोठी बातमी : अवैध सावकारी विरोधात मुक्ताईनगर तालुक्यात आठ ठिकाणी धाडी
सहकार विभागाच्या कारवाईने उडाली खळबळ : पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Raids at eight places in Muktainagar taluka against illegal lending मुक्ताईनगर : अवैध सावकारी विरुद्ध तालुक्यात सहकार विभागाकडून छापेमारी करण्यात आली. एकूण आठ ठिकाणी हे छापे घालण्यात आले. कुर्हा काकोडा येथील संदीपकुमार शामसुंदर खंडेलवाल, राजकुमार रामकुमार खंडेलवाल, बळीराम चांगो महाजन, प्रतीक रामनिवास खंडेलवाल, आणि हरी किसन भोई यांच्याकडे छापे घालण्यात आले. सालबर्डी येथील प्रदीप बढे व बोदवड येथील वसंत खाचणे आणि कैलास गोपीचंद आहुजा यांच्याकडेही छापे पडले.
भुसावळातील नगरसेवक अपात्रता याचिकेवर आता 24 रोजी सुनावणी
यांच्या उपस्थितीत छापेमारी
छापे घालणार्या पथकाचे प्रमुख म्हणून एस.एफ. गायकवाड चोपडा तर जे.बी. बारी जामनेर, के.पी. पाटील अमळनेर, जी.एच. पाटील एरंडोल, मंगेशकुमार शहा मुक्ताईनगर, महेश कासार भडगाव, चंद्रकांत पवार चाळीसगाव आणि एन.के. सूर्यवंशी पाचोरा या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांच्या अधिकार्यांचा समावेश होता.
छाप्याच्या अहवालाकडे लागले लक्ष
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचे अधिकारी मंगेशकुमार शहा यांनी दिली. या छाप्यांचा अहवाल दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता छाप्याच्या अहवालाकडे व त्यावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.