Movements For Sale of Madhukar Sahakari Sugar Factory In Faizpur फैजपूरातील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या हालचाली
कारखाना भाडे तत्वावर देण्याची जिल्हा बँकेकडे पदाधिकार्यांची मागणी
Movements For Sale of Madhukar Sahakari Sugar Factory In Faizpur फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर कारखान्यावर प्राधिकृत अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली मात्र कोरोनामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. आर्थिक अडचणीमुळे निवडणूक निधी पूर्ण न भरल्यामुळे कारखान्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक ( साखर) औरंगाबाद यांनी 13 जून रोजी दिलेल्या आदेशान्वये मधुकर साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून, जळगावचे सहाय्यक निबंधक व्ही.एम.गवळी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, एकीकडे कारखान्यावर प्रशासक बसला असताना दुसरीकडे जिल्हा बँकेने कर्जापोटी कारखाना विक्रीला काढण्याची तयारी सुरू केल्याने कारखाना भाडे तत्वावर देण्यात यावा, अशी मागणी पदाधिकार्यांनी जिल्हा बँकेकडे केली आहे.
जळगावातील 24 वर्षीय तृतीयपंथीयाची गळफास घेवून आत्महत्या
गुलाबराव देवकर यांना निवेदन
बँकेने कारखाना विक्रीचा घाट घातल्याने कारखाना परीसरातील जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. बँकेचे हे धोरण शेतकरी, कामगार व मजूर यांच्या दृष्टीने योग्य नाही. या लोकांचे भवितव्य लक्षात घेऊन कारखाना विक्री न करता तो भाडे तत्वावर द्यावा, अशा आशयाचे निवेदन बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना मधुकर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील व संचालक मंडळाने दिले आहे.
कारखाना विक्रीचा घाट
कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्यापूर्वी वेळोवेळी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाशी झालेल्या चर्चेनुसार जिल्हा बँक कारखाना ताब्यात घेऊन 25 वर्षे भाड्याने देण्याची भूमिका घेतली परंतु बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 जून रोजी झालेल्या सभेत कारखाना विक्री करून टाकायचा, असा विषय झाला होता. बँकेचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांची कारखान्याचे चेअरमन यांच्याशी सभेच्या दुसर्या दिवशी संभाषण झाले की, कारखाना भाडे तत्वावर देण्याचा विषय रद्द करून कारखाना विक्री करण्याचा विषय घेण्यात आला आहे.