थोरगव्हाणच्या तरुणाची आत्महत्या
आत्महत्येचे कारण अस्पष्ट : सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
रावेर : तालुक्यातील थोरगव्हाण येथील 23 वर्षीय तरुणाने आपल्याच शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. पवन गणेश ठाकरे (23, कोळी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
झोक्यातून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू : एरंडोल तालुक्यातील घटना
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रावेर तालुक्यातील थोरगव्हाण गावातील पवन गणेश ठाकरे (कोळी) (23) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता मात्र शनिवार, 18 जून रोजी सकाळी पवन ठाकरे याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.
गावठी कट्ट्याच्या धाकावर धुळ्यात पाणी पुरी विक्रेत्याची दहशत : आरोपी जाळ्यात