धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने उत्राणच्या तरुणाचा मृत्यू
Young Man Dies After Being hit By a Running Train पाचोरा : रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने उत्राणच्या 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयवंत नरेंद्र चौधरी (21, उत्राण, ता.एरंडोल) असे मृत तरूणाचे नाव आहे.
रेल्वे क्रॉसिंगदरम्यान दुर्घटना
एरंडोल तालुक्यातील रहिवासी जयवंत नरेंद्र चौधरी हा रविवार, 19 जून रोजी दुपारच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खांबा क्रमांक 370/30 जवळ अप लाईनवरून रेल्वे क्रॉसींग करत असतांना धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला त्यात जयवंतचा जागीच मृत्यू झाला. जयवंत हा ट्रूक्टरवरुन मजुर पोहचविण्याचे काम करत आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई, एक विवाहित बहिण असा परीवार आहे. जयवंतच्या अकस्मात निधनाने उत्राण परीसरात शोककळा पसरली आहे.
पाचोरा लोहमार्ग पोलिसात नोंद
घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे एपीआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष बोरसे हे करीत आहे.