EKNATH SHINDE मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले : माझ्यासोबत 40 आमदार
EKNATH SHINDE मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर असतानाच राजकीय भूकंपाचे केंद्र असलेल्या सुरतमधून मध्यरात्री बंडखोर आमदार गुवाहाटीकडे विशेष विमानाने रवाना झाले तर आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा मंत्री एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यात काही अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काही व्हिडिओतून या बंडखोर आमदारांसोबत भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह संजय कुटे हेदेखील असल्याचे दिसत आहे.
भाजपाकडून सुरक्षेबाबत विशेष खबरदारी
महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपकडून केला जात असतानाच बुधवारपासून राजकीय हालचाली तीव्र होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा होत असतानाच भाजपने या आमदारांची विशेष खबरदारी घेतली असून एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेसह अपक्ष 33 आमदार असल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे माझ्या पाठिशी 35 नाही 40 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मंगळवारी रात्री काही बसेस या आमदारांना विमानतळावर घेऊन जाण्यासाठी सूरतमधील हॉटेलमध्ये दाखल झाल्या. यातून या आमदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांना रात्री 2.15 वाजता विमानतळावर नेण्यात आले आणि तिथून खास विमानांनी गुवाहाटीत हे आमदार दाखल झाले आहेत.

आमदारांचा फोटो आला समोर
सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काढलेला फोटो समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 33 आणि बच्चू कडू व त्यांचे समर्थक असलेले एक आमदार आणि इतर एक आमदार असे मिळून 36 आमदार आहेत.
महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? एकनाथ शिंदे 11 आमदारांसह गुजरातमध्ये
पक्षांतर बंदी कायद्याचा असा आहे निर्णय : एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष
तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते !