नाराजीनाट्य : मंत्री एकनाथ शिंदेंना जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांची साथ


जळगाव : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा गुवाहाटीत पोहोचल्यानंतर केला आहे तर आज मंत्री शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्री शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश असून त्यात पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोरा शहराचे आमदार किशोर पाटील तसेच चोपडा आमदार लता सोनवणे यांचा समावेश आहे.

मंत्री शिंदे सोबत हे आहेत समर्थक आमदार
एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde)  यांच्यासोबत एकूण 32 आमदार असून यात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेच्या एका आमदाराचा देखील यात समावेश आहे.
एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde)
विश्वनाथ भोईर
राजकुमार पटेल
महेंद्र थोरवे
भारत गोगावले
महेंद्र दळवी
अनिल बाबर
महेश शिंदे
शहाजी पाटील
शंभुराज देसाई
बालाजी कल्याणकर
ज्ञानराज चौगुले
रमेश बोरणारे
तानाजी सावंत
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार
नितीन देशमुख
प्रकाश सुर्वे
किशोर पाटील
सुहास कांदे
संजय सिरसाट
प्रदीप जैस्वाल
संजय रायमुलकर
संजय गायकवाड
शांताराम मोरे
श्रीनिवास वनगा



प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
चिमणराव पाटील
नरेंद्र बोंडेकर
लता सोनावणे
यामिनी जाधव
बालाजी किनिकर

दरम्यान; जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेनेच्या सोबतच राहणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.

मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले : माझ्यासोबत 40 आमदार

महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? एकनाथ शिंदे 11 आमदारांसह गुजरातमध्ये 

पक्षांतर बंदी कायद्याचा असा आहे निर्णय : एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष

तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते ! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !