शिरागडला दाम्पत्यास मारहाण : कुटुंबियांविरोधात गुन्हा


यावल : शेतातील ट्युबेलचे विज बिल आम्ही भरले आहे आणि पाणी तु का भरतो, असे सांगत लहान भाऊ व त्याच्या पत्नीला मोठ्या भाऊ ने वडील, पत्नी व मुलास सोबत घेत मारहाण केली. ही घटना शिरागड ता.यावल या गावात घडली असून महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी गुन्हा
तालुक्यातील शिरागड येथील रहिवासी रंजना युवराज साळुंखे या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची शेती पथराळे ता. यावल शिवारात गट क्रमांक 31 मध्ये आहे. त्या ठिकाणी ते काम करत होते व त्यांचे पती युवराज साळुंखे शेतात पाणी भरत होते. दरम्यान त्याचं वेळी त्यांचे जेठ चिंधु माधव साळुंखे यांच्या पत्नी संगीता साळुंके, मुलगा रूषीदास चिंधु साळुंखे व सासरे माधव मोतीराम साळुंखे शेतात आले आणि त्यांनी युवराज साळुंखे यांना सांगितले की या शेतातील टुबेलचे लाईट बिल आम्ही भरले आहे. मग तू पाणी का भरत आहे. पाणी भरणे बंद कर, तेव्हा युवराज साळुंके यांनी पाणी भरणे बंद केले. मात्र, याच कारणावरून या चौघांनी रंजना साळुंके आणि युवराज साळुंके या दोघांना जबर मारहाण केली. या महिलेच्या पायाला आणि युवराज साळुंके यांच्या हाताला दुखापत झाली तेव्हा या प्रकरणी रंजना युवराज साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल चौघांविरूध्द मारहाण करून जबर दुखापत करणे,शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर रमजान तडवी करीत आहे.



भुसावळात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !