सात वर्षीय बालिकेचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील एका भागात राहणार्या सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मंगळवार, 21 जून रोजी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरागडला दाम्पत्यास मारहाण : कुटुंबियांविरोधात गुन्हा
तरुणाविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका भागात 7 वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दामोदर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) याने पीडित मुलीला किराणा दुकानावर बोलून तिचा लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत अश्लिल चाळे केले.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
हा प्रकार पीडित मुलीने घराच्यांना सांगितला. मुलीच्या आईसह नातेवाईकांनी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दामोदर पाटील यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.
दाम्पत्यास नकली दागिणे देत साडेचार लाखात गंडवले
