जळगाव जिल्ह्यात नव्याने कोरोनाचे 12 रुग्ण आढळले !


जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 12 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून सध्या जिल्ह्यात 36 कोरोनाबाधीत रुग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली.

भुसावळात आढळले सहा रुग्ण
जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात जळगाव जिल्ह्यात नव्याने 12 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर 5, भुसावळ तालुका 6 आणि चोपडा तालुक्यातून 1 असे एकुण 12 रूग्ण आढळून आले आहे.



36 रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 51 हजार 613 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक लाख 48 हजार 985 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात 36 रुग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी प्रसिध्दपत्रकान्वये दिली.

संजय राऊत स्पष्टच म्हणाले : आघाडीतून बाहेर पडू मात्र समोर येवून चर्चा करा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !