झन्ना मन्ना जुगार अड्ड्यावर धाड : पाच जुगारी जाळ्यात
पाचोरा : तालुक्यातील नगरदेवळा परीसरात झन्ना-मन्ना जुगार खेळत असतांना नगरदेवळा दुरक्षेत्र पोलिसांनी धाड टाकून पाच जुगारींना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून एक पत्त्यांचा कॅट व 1 हजार 900 रुपये पोलिसांनी जप्त केले.
भुसावळ शहरात महसूल विभागाच्या पाहणीत आढळली 502 ब्रॉस अवैध वाळू
गोपनीय माहितीवरून कारवाई
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा ते शिंदोळ रोडवरील घनश्याम गोंधळी यांचे शेताजवळ अग्नावती नदी काठाजवळ काहीजण झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती नगरदेवळा दूरक्षेत्र पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांच्या एका पथकाने बुधवार, 22 जुन रोजी रात्री घटनास्थळी धाड टाकत घटनास्थळावरून रवींद्र रमेश कोळी, जय राजेंद्र पवार, शरद हिरामण भोई, दीपक उर्फ विजय रामा कोळी व सुरेश लालचंद कुर्हाडे (सर्व रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) यांना ताब्यात घेतले. संशयीतांकडून एक हजार 900 रुपये व एक पत्त्यांचा कॅट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.प्रकाश संतोष पाटील हे करीत आहे.

