नायगाव शिवारात केळी घडांचे नुकसान : तिघांविरोधात गुन्हा


Damage Of Banana Bunches In Naigaon Shivara : Crime Aagainst Three मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव शिवारातील शेत गट क्रमांक 151 मधील शेतात केळी घड चोरताना महिलेसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले मात्र दोघे पसार होण्यात यशस्वी झाले तर भारती वाघ नामक महिलेला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी सुभाष तुकडू बेलदार (41, कोटा, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार भारती राहुल वाघ, लिलाबाई भास्कर पोहेकर व राहुल राघो वाघ (रा.नायगा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष बेलदार यांच्या नायगाव शिवारातील शेतात तिघे संशयीत रविवार, 26 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास केळी घड चोरताना आढळले तर तक्रारदार येताच संशयीतांनी पाच हजार 500 रुपये किंमतीचे केळी घड सोडून पळ काढला. या प्रकरणाचा तपास नाईक उमेश महाजन करीत करीत आहेत.



किनगावच्या वृद्धेचा खून : आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !