भुसावळात घरासमोरून एकाची दुचाकी लांबवली


In Bhusawal, a two-wheeler was dragged in front of the house भुसावळ : शहरातील आयान कॉलनी, गॅलेक्सी हॉटेलमागील वास्तव्यास असलेल्या रहिवाशाच्या दारासमोर लावलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्याने लांबवली. याबाबत अफसरखान युनूस खान (38, आयान कॉलनी, गॅलेक्सी हॉटेलमागे, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.के.1813) घराबाहेर लावली होती मात्र चोरट्याने संधी साधून 29 रोजी रात्री 11 ते 30 जून रोजी सकाळी सहावाजेदरम्यान दुचाकी लांबवली. तपास पोलिस नाईक अन्वर शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !