विषारी औषध सेवनाने वृद्धाची आत्महत्या
Elderly man commits suicide by consuming poisonous drugs मुक्ताईनगर : तालुक्यातील भोजना येथील 70 वर्षीय वृद्धाने काहीतरी विषारी द्रव सेवन केल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अकस्मात मृत्यूची नोंद
परबत रुपा न्हावकर (70, भोजना) असे मयताचे नाव आहे. न्हावकर यांनी काहीतरी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर त्यांना शनिवारी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.
