रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ उत्साहात
अध्यक्षपदाची सूत्रे ऋषी शुक्लांनी तर सचिवपदाची प्रकाश ठाकूर यांनी घेतली शपथ
भुसावळ : रोटरी क्लबच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ नुकताच रोटरी क्लब ऑफ भुसावळ सभागृहात पार पडला. यावेळी अध्यक्षपदाचे सूत्र ऋषी शुक्ला तर सचिवपदाची प्रकाश ठाकूर यांनी पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला सह प्रांतपाल विकास पाचपांडे प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी जळगाव ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी होते.
चार्टर देवून सोपवला अध्यक्षपदाचा कारभार
सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष राजेंद्रकुमार फेगडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषी सुक्ला यांना रोटरी पिन कॉलर तसेच चार्टर देऊन अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला तसेच आपल्या कार्यकाळातील कार्याची माहिती दिली. राजेंद्रकुमार फेगडे यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना सदिच्छा दिल्या. यावेळी, नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषी सुक्ला यांनी नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टरची घोषणा केली. त्यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षात रोटरी क्लब घेणार असलेला वेगवेगळे प्रकल्पांची माहिती दिली. अध्यक्षांचा परीचय गोपाल तिवारी यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय गजानन ठाकूर यांनी केला. सूत्रसंचालक डॉ. रवींद्र शुक्ला यांनी तर आभार सचिव राजेंद्र पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी रेल सिटीचे अध्यक्ष मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित्र पोतदार, रॉयल क्लब ऑफ भुसावळ रॉयलच्या अध्यक्ष प्रसन्न पांडे, सचिव सागर विसपुते, इनरव्हिलच्या अध्यक्ष रुचिका शर्मा, सचिव प्राची राणे, श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे, सचिव रागिणी पुराणिक, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सचिव जयश्री ढाके उपस्थित होते. कार्यक्रमाला पांडुरंग राव, गोपाल तिवारी, राजेश अग्रवाल, डॉ.नारायण आर्वीकर, डॉ.माया आर्वीकर, विकास कात्यायनी, मदन बोरकर, सारंग चौधरी, आरती चौधरी, गोपीनाथ अय्यर, राजश्री कात्यायनी, राजीव सहगल, हेमंत नाईक, अनंत पाटील, प्रदीप दवे, आणि निमंत्रित अतिथी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी क्लब बॉय सतीश झांबरे यांनी परीश्रम घेतले.