भुसावळातील तरुणाचा अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबवला
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील घासीलाल दुकानाजवळ उभ्या असलेल्या तरुणाच्या खिशातील 12 हजार 300 रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात हरीष शशीकांत चौधरी (27, रा.पंढरीनाथ नगर, हनुमान नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर रोडवरील घासीलाल दुकानासमोर तक्रारदार उभे असताना त्यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.