लोहार्‍याच्या तरुण विवाहितेची आत्महत्या : पती विरोधात सावदा पोलिसात गुन्हा


Blacksmith’s Young Married Woman Commits Suicide : Sawada police file a case against her husband सावदा : रावेर तालुक्यातील लोहारा येथील 19 वर्षीय विवाहित तरुणीने 13 एप्रिल 2022 रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी कुटुंबियांनी तक्रार न दिल्याने दफनविधी करण्यात आला होता मात्र मयत तरुणीच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्यानंतर काही दिवसांपूर्वी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सावदा पोलिसात मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रीक्षा घेण्यासाठी पैसे न आणल्याने छळ
सुरत येथील रहिवासी असलेल्या नजमा सलमान तडवी (19) या तरुणीचा लोहारा, ता.रावेर येथील सलमान तडवीसोबत 25 जानेवारी 2022 रोजी विवाह झाला मात्र लग्नानंतर पतीने रीक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ सुरू केला होता मात्र पैशांची पूर्तता न झाल्याने छळ अधिकच वाढला होता व या त्रासाला कंटाळून नजमा तडवी (19) या विवाहितेने 13 एप्रिल 2022 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी हसन भायखाँ तडवी (50, मेडिकल कॉलेज जवळ, सिंधी गेटजवळ, सुरत) यांच्या फिर्यादीनुसार सलीम तडवी (लोहारा, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले करीत आहेत.


जळगावातील 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !