पुणे-जबलपूर, मुंबई-रेवा गाड्यांना मुदतवाढ


Pune-Jabalpur, Mumbai-Rewa Tains Extended  भुसावळ : प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते रेवा आणि पुणे-जबलपूर दरम्यान धावणार्‍या फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांचा कालावधीत वाढवला आहे. यामुळे सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

वेळ व थांब्यात कुठलाही बदल नाही
02131 पुणे-जबलपूर स्पेशल ही गाडी पुणे येथून 15 ऑगस्ट ते 26 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी सुटणार आहे. तर 02132 जबलपूर-पुणे सुपरफास्ट ही स्पेशल गाडी 14 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे पुण्यातून जबलपूरला व जबलपूरहून पुण्यात जाणार्‍यांची सोय होईल. तसेच 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रेवा ही गाडी 29 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी धावेल. 02187 रेवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल गाडी 28 जुलै ते 29 सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. या गाड्यांच्या धावण्याचे दिवस, वेळ आणि थांबे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.


नशिराबाद टोल नव्हे झोल प्लाझा : बोगस मशिनींद्वारे वाहनधारकांना दररोज लाखोंचा गंडा

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !