भुसावळातील तरुणीची तापी पात्रात आत्महत्या


Suicide Of A Girl In Bhusawal In Tapi Patra भुसावळ : शहरातील यावल रोडवरील राहुल नगरातील 20 वर्षीय घटस्फोटीत तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी या तरुणीचा मृतदेह सापडल्याने शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी तरुणी घराबाहेर पडल्याने तिचा शोध सुरू होता मात्र मंगळवारी या तरुणीचा मृतदेहच हाती लागला. राधा ताराचंद निकम (20, राहुल नगर, भुसावळ) असे मयत तरुणीचे नाव आहे.

शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
राधा निकम या सोमवारपासून बेपत्ता झाल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र मंगळवारी सकाळी तापी पात्रात त्यांचा मृतदेह आढळल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला. भुसावळ शहर पोलिसात मयताचे भाऊ राम ताराचंद निकम (21) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे एएसआय मोहम्मद अली सैय्यद व विशाल लाड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. तरुणीच्या मृत्यूने राहुल नगरात शोककळा पसरली.

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !