डांभूर्णी गावातील 33 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

गावात हळहळ : घरातील कुणीही नसताना विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल : यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


Suicide Of a 33 Year old Married Woman In Dambhurni Village यावल : तालुक्यातील डांभूर्णी गावातील 33 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. अर्चना राजेंद्र कोळी (33) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घरी कुणीही नसताना घेतला गळफास
मयत विवाहिता अर्चना कोळी यांचे सुरतचे माहेर असून डांभूर्णी हे सासर आहे. बुधवारी दुपारी पती व सासरे बाहेर असताना तसेच घरी कुणीही नसताना त्यांनी गळफास घेतल्याची बाब उघड झाली. विवाहितेच्या पश्चात पती, सासरे, लहान दोन मुली व एक मुलगा असा परीवार आहे. दरम्यान, माहेरची मंडळी गुरुवारी येणार असल्याने शवविच्छेदन केल्यानंतर विवाहितेवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार हवालदार अजीज शेख व नरेंद्र बगुले करीत आहेत.




भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरटा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !