माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांचा उपक्रम : आम्ही साहेबांचे शिलेदार : समाधान महाजन


भुसावळ : शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्ताने कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यातर्फे जळगाव रोडवरील भुसावळ नगरपालिका संचलित शाळा क्रमांक 29 च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वॉटर बॅग (पानी बॉटल) वाटप करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन (सर), शिवसेना माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शिवसेना शहरप्रमुख निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, उपतालुकाप्रमुख मनोहर बारसे, गोकुळ बाविस्कर, पवन नाले, अमोल पाटील, धीरज वर्डोणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते. बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे लोकहितार्थ कार्य करा, समाजकारण करा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) हे नेहमी असे लोकहितार्थ कार्य करतात आणि पुढे ही करत राहणार असून आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांचे शिलेदार असल्याचे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले.




भुसावळात आरोग्य शिबिराचे आयोजन
भुसावळ : शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनगरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी 157 हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन परीसरातील ज्येष्ठ नागरीक गोपाळ पाटील, गजानन चव्हाण, सुकदेव भोई, वासुदेव चौधरी, विष्णू जगताप, संगीता रणदिवे, राजाराम चौधरी यांनी केले.

यांची होती उपस्थिती
जिल्हाप्रमुख समाधान महाजन, स्थानिक लोकाधिकार समिती सदस्य अजित झाझम, राकेश भाटकर, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा, उपशहर प्रमुख पवन नाले, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, धीरज वढोणकर यांनी भेट दिली. तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी शिबिस्थळी वेळोवेळी उपस्थित होते. दरम्यान, विभागप्रमुख अमोल पाटील, योगेश सपकाळे, यश बाविस्कर, गिरीश राणे, संदीप भोई, रीतीक कोळी, विशाल सपकाळे, निखील चौधरी यांनी परीश्रम घेतले.

डांभूर्णी गावातील 33 वर्षीय विवाहितेची आत्महत्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !