भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बांधील

भुसावळातील युवा सेवा पदाधिकार्‍यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची घेतली भेट


भुसावळ : शिवसेनेतून शिंदे सेना बाहेर पडल्यानंतर राज्यातील घडलेल्या स्थित्यंतरानंतर संघटनात्मक बांधणीसाठी भुसावळातील युवा सेना पदाधिकार्‍यांनी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरुण सरदेसाई यांची नुकतीच भेट घेतली. भुसावळ येथील युवा सेना शहरप्रमुख सुरज पाटील यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी भुसावळ विधानसभा मतदार संघातीलस्थिती विषयी चर्चा केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी युवा सेना शहरप्रमुख सुरज पाटील, तालुकाप्रमुख हेमंत बर्‍हाटे, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकात शर्मा, विभाग प्रमुख भूषण तायडे, धीरज सोनवणे व म्रुगेन कुलकर्णी या युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. भुसावळ विधानसभा मतदार संघातील स्थितीविषयी त्यांच्याशी चर्चा केली. भुसावळ तालुका हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो ढासळू देऊ नका व जोमाने तयारीला लागा, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही उपस्थित पदाधिकार्‍यांनी यावेळी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !