Speeding truck collides with two-wheeler : Two brothers killed in Karjod अज्ञात वाहनाने उडवल्याने कर्जोदमधील भावंड जागीच ठार


Siblings in Karjod killed on the spot after being blown up by an unknown vehicle रावेर : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघात मजुरी काम करणारे दोघे सख्खे भाऊ ठार झाले. हा अपघात सोमवारी दुपारी भोकरी-कर्जोद दरम्यान घडला. सुनील नारायण हरीजन (40) व अनिल नारायण हरीजन (35, कर्जोद, खंडवा, मध्यप्रदेश) अशी मयतांची नावे आहेत.

सर्वसामान्य कुटुंबावर कोसळले संकट
हरीजन परीवार कर्जोद गावाजवळ रोजगारानिमित्त काही दिवसांपूर्वीच आला होता. सुनील व अनिल हे बंधू कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रक (क्रमांक टी.एन.28 डी.ए.7015) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे भाऊ जागीच ठार झाले. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत कुटुंबाचा रहाटगाडा हाकणार्‍या कुटुंबावर या अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघेही बंधू विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी व लहान चिमुकले असा परीवार आहे. दोघांचे वडील भिक्षा मागून चरीतार्थ चालवतात. याबाबत कर्जोद पोलिस पाटील अमोल महाजन यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शंन्मुगम नटराजन याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !