श्रमिक कामगार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मयुर अंजाळेकर


Mayur Anjalekar as the District Vice President of Shramik Kargar Sangathan भुसावळ : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी मयुर राजेंद्र अंजाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख तसेच सहाय्यक सचिव आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ,भारत सरकारचे ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कामकाज चालते. संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर (मंत्रालय) तसेच भिमेश मुतूला, संस्थापक सचिव आणि जिल्हाध्यक्ष अशोक राठोड यांनी अंजाळेकर यांचे रुग्णसेवा तसेच त्यांचे कार्य पाहून ही नियुक्ती केली आहे.

मयूर अंजाळेकर सामाजिक कार्यात अग्रेसर
मयूर अंजाळेकर सध्या आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष असून भारतीय मानवाधिकार परीषदेचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी आतापर्यंत 12 पेक्षा जास्त बाळांचे हृदयाचे आणि कानाच्या शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत शिवाय चार कॅन्सर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. कोरोनासारख्या महामारीत त्यांनी गरजू लोकांना मोफत धान्य वाटप केले तर त्यांनी केलेले कार्य तसेच रुग्णसेवा पाहून त्यांचे सर्वत्र स्तरावरून कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !