The thieves stole the bike from Bhusawal भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Bhusawal भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून शहरातील 32 खोली, रॉकेट बेकरीजवळून 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची बाब 31 रोजी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय
तक्रारदार शेख साजीद शेख शबीर (45, भुसावळ) यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 ए.एम.0646) ही 32खोली, रॉकेट बेकरीजवळ लावल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून 31 जुलैच्या रात्री 11.30 ते 1 ऑगस्टच्या पहाटे साडेसहा वाजेदरम्यान केव्हातरी संधी साधून लांबवली. या प्रकरणी शेख साजीद यांच्या तक्रारीनंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक आशा बावस्कर करीत आहेत.

