An adult in Bhusawal City Committed Suicide By Hanging Himself At Home भुसावळ शहरातील प्रौढाची घरातच गळफास घेऊन आत्महत्या


An adult in Bhusawal City Committed Suicide By Hanging Himself At Home भुसावळ : शहरातील जुने सतारे भागातील खळवाडी परीसरातील हेमचंद्र दिगंबर गाजरे (45) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. गाजरे हे अविवाहित असून घरी वडील, लहान भाऊ परिवारासह राहतात. बुधवारी घरी कोणीही नसताना हेमचंद्र यांनी छताला दोरी बांधून गळफास घेतला.

शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
परीसरातील लोकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातून सहायक फौजदार अनिल चौधरी, सागर देहाडे हे घटनास्थळी आले. पंचनामा करून गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवून ट्रामा केअर सेंटरमध्ये विच्छेदनासाठी रवाना केला. तेथे शवविच्छेदन होऊन मृतदेह हा नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. डॉ.मिलिंद जावळे यांच्या खबरीवरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !