हप्ता मागितल्याच्या कारणावरून शिरपूरात दोन गट भिडले : 35 जणांविरोधात गुन्हा


Two groups clashed in Shirpur over demand For Installments : Crime against 35 People शिरपूर : शहरात कॅफे चालवणार्‍या एका तरुणाकडे मागितलेला हप्ता न दिल्याच्या कारणावरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

ही घटना मंगळवारी दुपारी महात्मा फुले हायस्कूलसमोर घडली. पोलिसांत तक्रार दिल्याने 16 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात चौघे जखमी झाले असून, तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. तर विरोधी गटाने दिलेल्या तक्रारीनुसार 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत दुसर्‍या गटाचे दोन जण जखमी झाले आहेत.

हप्ता मागण्यावरून हाणामारी
सिद्धार्थ नगरात राहणारा प्रितेश उर्फ चंकी कैलास बोरसे कॅफे चालवतो. त्याच्याकडे हप्ता देण्याची मागणी केली. यावरून मंगळवारी महात्मा फुले हायस्कूलसमोर त्याच्यावर हल्ला केला. मदतीला आलेल्या राहुल प्रकाश शेटे, बिरबल कैलास बोरसे, कल्पेश कैलास बोरसे यांनाही मारहाण करीत सोन्याची चेन हिसकावून घतली. याप्रकरणी अतुल ब्राम्हणे, सिद्धार्थ कढरे, प्रकाश कढरे, हंसराज उर्फ हक्शा कढरे, गणेश उर्फ आबा दौलत चौधरी अशा 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !