Fraud of 4 lakhs by forging signatures in the name of wife पत्नीच्या नावाने बनावट स्वाक्षर्‍या करीत चार लाखांची फसवणूक


Cheating of wife by forging signature: Case against husband in MIDC police जळगाव : बनावट स्वाक्षर्‍यांचा आधार घेत पतीने पत्नीच्या नावाने बुक केलेला प्लॅट रद्द करीत चार लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळते करून फसवणूक केली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाद झाल्याने पत्नी आल्या माहेरी
पूनम अभिषेक शर्मा (32, नेहरूनगर, मोहाडी, जळगाव) या आई-वडील भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या कर्नाटक राज्यातील बंगलरू येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. 2015 मध्ये त्यांचा विवाह अभिषेक सूनील शर्मा (वय-32) रा. आदर्शनगर, जळगाव यांच्याशी झाला. दोघे पती-पत्नी हे नोकरीला कर्नाटक येथे नोकरी करतात. त्यानंतर दोघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये बंगलरू येथे एकूण 79 लाख 32 हजार रुपये किमतीचा फ्लॅट बुक केला. त्यासाठी त्यांनी 16 लाख रूपये देखील अडव्हान्स म्हणून दिले. यामध्ये पूनम शर्मा यांचे 8 तर त्यांचे पती अभिषेक शर्मा यांचे 8 असे एकूण 16 लाख रुपये दिले होते. सदर फ्लॅट हा दोघांच्या नावे रजिस्टर केला होता. याचदरम्यान पती-पत्नीचा वाद झाल्याने पुनम शर्मा या माहेरी नेहरूनगर, जळगाव येथे आईवडिलांकडे राहण्यासाठी गेल्या तर तीचा पती आदर्श नगर येथे राहत आहे.

खोट्या स्टॅम्प पेपरद्वारे लाटली रक्कम
अभिषेक शर्मा याने पत्नी पूनम शर्मा यांना न सांगता पावर ऑफ अँटर्नीसाठी 500 रुपये स्टॅम्प पेपर वरती बनावट स्वाक्षरी करून फ्लॅट घेण्याचा व्यवहार सौदा रद्द केला. तसेच बँकेचे लोन देखील रद्द करून टाकले. फ्लॅट घेण्यासाठी दिलेल्या 16 लाख रुपये पूनम शर्मा यांच्या हिस्स्याचे 4 लाख रूपेय त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. याबाबत पुनम यांनी कंपनीचा मॅनेजरला फोन करून विचारले असता पती अभिषेक शर्मा याने पावर ऑफ न्टर्णीचा अधिकार दिलेला नसतांना प्लॅट रद्द केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पत्नी पूनम शर्मा यांनी मंगळवार 2 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती अभिषेक शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद गिरासे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !