भक्तामर स्त्रोत्रातून अंधःकार नष्ट : मुनिश्री आलोककुमारजी
भुसावळ : भक्तामर स्त्रोत्र प्रकाश करणारा, अंधःकार नष्ट करणारा, आलंबन देणारा, पाप नष्ट करणारा मंत्र असल्याचे विचार मुनिश्री आलोककुमारजी यांनी व्यक्त केले. वज्रपंजर स्त्रोत्राने त्यांनी शहरात अनुष्ठानची सुरूवात केली. प्रभूसोबत अनुष्ठानाच्या माध्यमातून कसे एकरूप होता येते याचा प्रयोग त्यांनी यावेळी करून घेतला. भुसावळ शहरातील तेरापंथ भवनात मुनिश्री आलोककुमार आदी ठाणे- 3 यांच्या उपस्थितीत भक्तामर स्त्रोत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
बाह्य व आंतरीक समस्यांचे निराकरण
मुनिश्री लक्ष कुमारजी म्हणाले की, मंत्राच्या साधनेने मंत्रांच्या साधनेने बाह्य तसेच आंतरीक समस्यांचे निराकरण होत असल्याने याचे रोज अनुष्ठान करावे तर तीर्थकरांच्या स्तुतीने आपण शिखरापर्यत पोहचू शकतो, ती क्षमता आपण अर्जित करू शकतो, असे विचार मुनिश्री हिमकुमारजी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास 45 पती-पत्नी सहभागी झाले होते. अन्य श्रावक समाजातील बांधवही सहभागी झाले. यावेळी कोल्हापूर, जळगाव, जामनेर, कुर्हा, वरणगाव, दोंडाईचा, धुळे आदी ठिकाणाहून श्रावक समाज बांधवांनी उपस्थिती दिली.

