भुसावळात अंगणवाडी सेविकांसाठी ‘एक दिवस माझ्यासाठी उपक्रम’


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीस यांच्यासाठी शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘एक दिवस माझ्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला उत्साहाने सहभागी झाल्या. माळी भवनात गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, पोस्टर स्पर्धा, संगीत खुर्ची, प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. पाच लकी ड्रॉ मध्ये महिलांची आवडती पैठणी देण्यात आली. डॉ.मनीषा दावलभक्त यांनी महिलांना स्त्री आरोग्यावर मार्गदर्शन केले. माधुरी गुर्जर यांनी स्त्रियांना व्यायाम किती गरजेचा आहे याबाबत माहिती दिली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
गटविस्तार अधिकारी एकनाथ चौधरी यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या 13 ते 15 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार्‍या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमा संदर्भात सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ.मनिषा दावलभक्त, पिंकेथॉनच्या माधुरी गुजर, वसुंधरा जायंट ग्रुपच्या अध्यक्षा महानंदा पाटील, परीक्षक जयश्री चौधरी, महिला बालविकास प्रकल्पाधिकारी रेखा गायकवाड तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सचिव लता सोनवणे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन जयश्री दवे तर आभार बोरीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्य अनिता आंबेकर, मनीषा काकडे, वैशाली भदाणे, पूजा पाटील, अनुपमा बोरीकर, शोभा जाधव, संध्या रोझतकर आदींनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !