अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार
वाशिम/यवतमाळ : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी वाशिम येथील लॉजवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राजू ऊर्फ श्यामसिंग भैरवसिंग ठाकूर (25, रा. भईसागर, ता.कोट्टा, राजस्थान, ह.मु. पोखरी, ता.महागाव) आणि शेख नाझीम शेख इमाम (25, रा.धनोडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लॉजवर नेत केला अत्याचार
मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी पीडिता वडिलांसह मामाच्या गावाला जाण्यासाठी हिवरा बसस्थानकावर आली. तेथे वडील बाजूला हॉटेलवर चहा पिण्यास गेले. दरम्यान, मुलीची ओळख असलेला श्यामसिंग ठाकूर आणि त्याचा मित्र शेख नाझीम शेख इमाम हे दोघे दुचाकीने तेथे आले. त्यांनी तिला जबरीने दुचाकीवर बसवून पुसदमार्गे वाशिम येथे नेले. तेथे बस स्टँड जवळील एका लॉजमध्ये नेऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने शारीरिक अत्याचार केला. यानंतर त्या मुलीला आरोपींनी पुसद येथील शिवाजी चौकात आणून सोडले. दोघांनी तेथून पोबारा केला. पीडित मुलीने वसंतनगर पोलीस ठाणे गाठून आपबीती कथन केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

